आरक्षणाच्या मागणीकरिता अजित पवारांना घेराव

January 29, 2009 1:01 PM0 commentsViews: 6

29 जानेवारी औरंगाबादराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा संपर्कनेतेपदी निवड झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाचं औरंगाबादेत आले होते. यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं वाहन अडवून छावा आणि शिवसंग्राम संघटनेनं त्यांना घेराव घातला. यावेळी लवकरच आरक्षणाबाबतचा निर्णय होईल, असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं. याबाबत छावा संघटनेचे मिलिंद पाटील म्हणाले, अजित पवार इथं आलेलं असताना आम्ही त्यांची गाडी अडवून घेराव घातला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे. पण सरकार आरक्षण देण्यास दिरंगाई करत आहे. पण आता मराठा समाज मागे हटणार नाही. माजी राष्ट्रपती वेकंटरमण यांच्या निधनामुळे सध्या देशभर दुखवटा पाळला जात आहे. त्यामुळे आम्ही आक्रमक भूमिका घेतली नाही.

close