मुंबईत विमान अपहरणाचा धोका

January 29, 2009 1:32 PM0 commentsViews: 4

29 जानेवारी मुंबईमुंबईत दहशतवाद्यांकडून विमान तसंच हेलिकॉप्टरचं अपहरण होण्याचा धोका आहे, अशी सूचना केंद्राकडून राज्याला मिळाली आहे. गृहमंत्री जयंत पाटील यांनीच याविषयीची माहिती दिली आहे. यामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि पोलिसांना सावधानतेचे आदेश देण्यात आले आहेत. दहशतवादी विमान किंवा हेलिकॉप्टर हायजॅक करू शकतात. त्यामुळे संबंधीतांना सर्तकतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच एअरपोर्टवरील सुरक्षा यंत्रणा सर्तक करावी अशी सूचना करण्यात आली आहे. विमान सेवेसंबंधी ज्या वेगवेगळया सुरक्षा घ्यायच्या असतात त्याबद्दल पोलिसांना आदेश दिले गेले आहेत.अशी माहिती गृहमंत्री जयंत पाटील यांनी दिली.

close