मनसेच्या 2 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

January 29, 2009 1:34 PM0 commentsViews: 2

29 जानेवारी ठाणेकल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादीला सुरुंग लावल्यानंतर शिवसेनेनं ठाण्यात मनसेलाही खिंडार पाडलं आहे. ठाणे महानगरपालिकेतील मनसेच्या 3 पैकी 2 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. रुपाली कदम आणि प्रकाश राऊत अशी या नगरसेवकांची नावं आहेत. 24 जानेवारीला राज ठाकरेंची ठाण्यात जाहीर सभा झाली होती. या सभेला रुपाली कदम आणि प्रकाश राऊत हे दोघेही हजर होते. पण आता अचानक या दोघांच्या शिवसेना प्रवेशामुळे ठाण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या ठाणे जिल्हा नेतृत्वाला कंटाळून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं या नगरसेवकांनी सांगितलं आहे.मनसे नगरसेवकांच्या शिवसेनेत प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्ववादी तसेच मराठी माणसाबद्दलचे विचार आणि बाळासाहेबांचं कार्य त्यांना पटलेलं आहे. आता या कार्यात त्यांनाही सहभागी व्हायचं आहे म्हणूनच त्यांनी शिवसेनेत प्रवेश कला आहे.

close