मुंबई गँगरेप : एक आरोपी अल्पवयीन

August 30, 2013 4:12 PM1 commentViews: 577

mumbai gang rape_new30 ऑगस्ट : मुंबईत छायाचित्रकार तरूणीवर सामूहिक बलात्कार प्रकरणीतला एक आरोपी अल्पवयीन असल्याचं कोर्टात स्पष्ट झालंय. जे जे हॉस्पिटलनं दिलेल्या अहवालानुसार तो अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालंय. त्या आरोपीला डोंगरी रिमांड होममध्ये पाठवण्यात आलंय. उर्वरीत तीन जणांना किला कोर्टात हजर करण्यात आलंय.

आरोपी कोर्टातून बाहेर जात असताना आरोपींवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली तसंच त्यांच्यावर टोमॅटो आणि आणि अंडी फेकली. दिल्लीत पाचवा आरोपी पकडल्यानंतर सर्व आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. हे

पाच आरोपी महालक्ष्मी येथील स्थानिक रहिवासी आहे. या पाच जणांच्या टोळीवर या अगोदरही चोरी,लुटमारीचे गुन्हे आहेत. एककीकडे या आरोपींनी अटक करण्यात आली तर दुसरीकडे यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला. त्याच्या जन्मदाखल्यावर खाडाखोड केल्याचंही समोरं आलं. त्यामुळे तो आरोपी खरंच अल्पवयीन आहे का हे तपासण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी या आरोपीची हाडांची चाचणी घेणार असं स्पष्ट केलं होतं.

त्यानुसार या आरोपीची चाचणी घेण्यात आली. त्यात हा आरोपी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे कोर्टाने त्यांची रवानगी डोंगरी बालसुधारगृहात केली आहे. मात्र उर्वरीत चार आरोपींविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • Bhajiya

    juvenile is free to rape anyone , anytime and anyone? What media is talking these days is unpredictable. Juvenile rapist is offered free food, cloth and shelter in addition to pleasure of raping women or girl then subsequently pampered as well as brought on lime light achiever.

close