अमरावतीमधील अंधांची क्रिकेट स्पर्धा

January 29, 2009 3:45 PM0 commentsViews: 5

29 जानेवारी अमरावतीधिरज खडसे अमरावतीत एका आगळ्या वेगळ्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. क्रिकेटमधला तोच थरार, तिच जिद्द, तोच जल्लोष.आणि हो प्रेक्षकांचा प्रतिसादही अगदी तसाचं उत्स्फूर्त. मॅच क्रिकेटचीच असली तरी खेळणारे खेळाडू अंध होते.छर्र छर्र असा आवाज करत येणारा चेंडू आणि फक्त त्या आवाजावर तो सीमापार टोलवणारा बॅट्समन. आपल्या अंधत्वावर मात करत रन्सचा डोंगर उभे करणारे खेळाडू हम भी किसीसे कम नही हेच त्यांच्या जल्लोषातनं दिसून येत होतं.अंध असणा-या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. अमरावतीतल्या चार संघानी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अंध विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याच्या हेतुनं 1995 पासून या स्पर्धा भरवण्यात येत आहे.या स्पर्धेचे आयोजक वासुदेव चांगणे सांगतात, या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना जिंकणं हरण्यापेक्षाही महत्त्वाची होती ती या खेळातली मजा.नागपूर आणि वरोरा संघात झालेल्या अंतिम सामन्यात वरोरा संघानं विजय मिळवला.

close