संसदेत पंतप्रधान आणि विरोधकांमध्ये चकमक

August 30, 2013 4:32 PM1 commentViews: 1047

pm vs bjp30 ऑगस्ट : पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी आज राज्यसभेत विरोधी पक्षांना, विशेषतः भाजपला चांगलंच फटकारलं. अर्थव्यवस्थेविषयी निवेदन करण्यासाठी पंतप्रधान राज्यसभेत उभे राहिले, पण त्यापूर्वी विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांच्या भाषणामुळे भाजपचे खासदार विशेष आवेशात होते.

त्यांनी पंतप्रधानांच्या भाषणात अडथळे आणायला सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या पंतप्रधानांनी विरोधकांना खडसावलं. राजकारण करण्याच्या नादात विरोधक पंतप्रधानपदाचा मान राखत नाहीत असं त्यांनी सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिलं. पंतप्रधानांनी कडक भाषा वापरल्यानंतर अरुण जेटलींनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आणि 2004 मधल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काही खासदारांना पैसे देऊन सरकारच्या बाजूनं वळवण्यात आल्याच्या आरोपाचा उल्लेख केला.

त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळ झाला. जेटलींचं म्हणणं कामकाजातून काढून टाकण्यात यावं अशी मागणी काँग्रेसच्या मणिशंकर अय्यर यांनी केली. त्यानंतर अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही भाजपच्या खासदारांना कडक शब्दात सुनावलं. त्यानंतर पंतप्रधानांचं निवेदन पुढे सुरू झालं.

पंतप्रधानांचे सवाल

  • - जगातल्या कोणत्या लोकशाहीमध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळाची ओळख करून देत असताना त्याला अडवलं जातं? हे 2004 मध्ये घडलं.
  • - जगातल्या कोणत्या लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये येऊन पंतप्रधान चोर है अशा घोषणा देतात?
    - जगातल्या कोणत्या देशामध्ये पंतप्रधान सभागसदांना पैसे देऊन विश्वासदर्शक प्रस्ताव जिंकतात?
    - विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले गेले,आता तुम्ही पंतप्रधानांचे का ऐकत नाही?

  • Nikhil

    Prime Minister walked out of Loksabha without listing to leader of Opposition. Where does this happen? Is this the protocol he is talking about?

close