भटकळची ‘स्फोटक’कबुली, पण बोधगया स्फोट नाकारला

August 30, 2013 5:04 PM1 commentViews: 613

yasin bhatkal33330 ऑगस्ट : इंडियन मुजाहिद्दीनचा सहसंस्थापक यासीन भटकळला अटक केल्यानंतर आता त्याने ‘स्फोट’ कबुली देण्यास सुरूवात केली. देशभरात झालेल्या स्फोटांमध्ये आपला हात असल्याचा स्पष्ट कबुली दिलीय. देशभरात जे स्फोट घडवून आणले त्याबद्दल आपल्याला पश्चाताप नाही असा आवही त्याने आणला. मात्र, बोधगया इथं झालेल्या साखली स्फोटात हात नसल्याचं त्यांनी सांगितलं.

बिहारमध्ये बोधगया येथील महाबोधी मंदिरात कमी तीव्रतेचे 10 स्फोट झाले होते. या स्फोटांचा संशय इंडियन मुजाहिद्दीनवर होता. मात्र या प्रकरणी पोलिसांच्या हाती अजूनही कोणतेचे धागेदोरे लागले नाही. गुरूवारी यासीन भटकळला अटक केल्यानंतर आज त्याची चौकशी सुरू झालीय यावेळी त्यांनी ही कबुली दिली.

अटक झाल्यानंतर भटकळला पाटण्यामधल्या मिलिटरी पोलीस कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं होतं. तिथं त्याची ही चौकशी झाली. आता एनआयएच्या अधिकार्‍यांनी भटकळला घेऊन एका बीएसएफच्या विशेष विमानानं दिल्लीला नेलं आहे. दिल्लीत एनआयए यासिनची चौकशी करणार आहे. तर महाराष्ट्र एटीएसही यासीनच्या ताब्याची मागणी करणार आहे.

  • Ashok Samindar Hole

    now its waiting time for punishment. how long it takes?

close