दाभोलकरांच्या खुनाला 10 दिवस मात्र मारेकरी मोकाटच

August 30, 2013 2:06 PM0 commentsViews: 146

dabholkar44430 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज 10 दिवस पूर्ण झाले. पण पोलिसांना अजुनही काहीच सुगावा लागलेला नाही. पोलिसांची 19 पेक्षा जास्त पथकं याचा तपास करत आहे. पोलिसांना अजून ना धागेदोरे मिळाले ना आरोपींना पकडण्यात यश आलं. त्यामुळे पोलिसांवरचा दबाव वाढतोय.

पोलीस दलातले सर्वोत्तम पोलीस अधिकारीही या तपासात मदत करतायत. दरम्यान, या घटनेत पोलिसांच्या हातात जो एकमेव पुरावा लागला तो म्हणजे सीसीटीव्ही फुटेज मात्र ते फुटेजही अस्पष्ट आहे. त्यात स्पष्टता यावी यासाठी ते फुटेज  लंडनच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिलीय.

यातल्या आरोपींची आणखी माहिती मिळाल्यास तपासात वेग येणार आहे. पुण्यात 20 ऑगस्ट रोजी दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी गेले असता मागून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून खून केला. या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट पसरली. दाभोलकांच्या हत्येचा कट होता असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याच स्पष्ट केलं होतं. मात्र अजूनही मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.

close