राज्यातले पब बंद करू- गोपीनाथ मुंडे

January 29, 2009 4:50 PM0 commentsViews: 6

29 जानेवारी कर्नाटकात पब प्रकरण तापलं असताना आता भाजपनं पबविरोधात मोठी आघाडी घेतली आहे. पब मुद्याबद्दल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांना विचारलं ते म्हणाले, या पूर्वी सत्तेत होतो तेव्हा राज्यातले सगळे पब बंद केले होते आणि आता राज्यात पुन्हा सत्ता मिळाली तर सुरू असलेले सगळे पब बंद करू अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांनीही पब संस्कृतीला विरोध केला आहे. तसंच माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांचीही हीच भूमिका होती. पबसारखी ठिकाणं समाजाला नक्कीच हानीकारक आहेत म्हणून सत्तेवर पुन्हा आल्यास पब बंद करू .

close