श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

August 30, 2013 10:02 PM0 commentsViews: 71

Image img_239702_nshrinivasan_240x180.jpg30 ऑगस्ट : बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यापुढच्या समस्या दिवसागणिक वाढत आहेत. कोलकात्यात बीसीसीआयच्या कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात आलीय.

पण, त्यापूर्वीच एन. श्रीनिवासन आणि बीसीसीआय यांना सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलीय. स्पॉट फिक्सिंग प्रकरणी नेमण्यात आलेली चौकशी समिती पुन्हा नेमण्यात यावी यासाठी बिहार क्रिकेट संघटना सुप्रीम कोर्टात गेलीय.

कोलकात्याच्या या बैठकीत एन श्रीनिवासन हे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याची सूत्रांची माहिती होती. पण या नोटीशीमुळे पुन्हा ते अडचणीत आले आहे.

close