आशियाई हॉकी कपमध्ये भारत फायनलमध्ये

August 30, 2013 10:06 PM0 commentsViews: 148

india hocky30 ऑगस्ट : आशियाई हॉकी कप स्पर्धेत भारताने आपली विजयी आगेकूच कायम राखत फायनलमध्ये धडक दिली. सेमी फायनलमध्ये भारताने मलेशियाचा 2-0 असा पराभव केला.

फायनलमध्ये भारताची गाठ दक्षिण कोरियाशी पडणार आहे. दक्षिण कोरियाने पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवामुळे हॉकी वर्ल्डकप स्पर्धेस पात्र ठरण्याच्या पाकिस्तानच्या आशा मात्र संपुष्टात आल्या. आणि त्यामुळेच भारत वर्ल्डकप स्पर्धेस पात्र ठरला आहे. 1971 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तान या स्पर्धेस अपात्र ठरलाय.

close