पब संस्कृतीला कर्नाटक सरकारचा विरोध

January 29, 2009 4:05 PM0 commentsViews: 1

29 जानेवारी मंगलोर पब हल्ल्यानंतर आता पबच्या मुद्द्याचं राजकारण करण्यात येतं आहे. या मुद्याला भाजपनं संस्कृतीरक्षणाचा रंग दिला आहे. श्रीराम सेनेचा प्रमुख प्रमोद मुतालिक याला पाठीशी घालणा-या कर्नाटक सरकारवर देशभरातून कठोर टीका झाली. कारवाई झाली खरी पण त्याचवेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी पब संस्कृती चालू देणार नसल्याचा कडक इशाराही दिला. कायदा हातात घेऊन स्त्रियांना मारहाण करण्याचा गंभीर मुद्दा राहिला बाजूला आणि पबची संस्कृती योग्य की अयोग्य या वेगळ्याच मुद्द्यावर चर्चा सुरू झाली.काँग्रेसने कर्नाटक सरकारवर टीका केली होती. पण पक्षाशी विसंगत भूमिका घेत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही पबसंस्कृतीवर टीका केली. निवडणुका आणि संस्कृतीरक्षणाच्या मुद्द्याचं राजकारण. स्त्रियांना मारहाण आणि त्याविरोधातली तरुणांची निदर्शनं. यासर्वात राजकीय पक्ष जर पबच्या मुद्यांचं भांडवल करत असतील तर मतांच्या आकडेमोडीत तरुणाईचा कल त्यांच्याकडे वळणार का हे आगामी निवडणुकीतच कळेल.

close