आसाराम समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला

August 31, 2013 3:58 PM1 commentViews: 1021

asram halla31 ऑगस्ट : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला कधीही अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आसाराम समर्थकांचा तोल ढासळलाय. आसाराम समर्थकांनी आज सकाळी जोधपूरमध्ये आयबीएन (IBN) नेटवर्कच्या पत्रकारावर हल्ला केला.

या हल्ल्यात IBN 7 चे पत्रकार भवानी सिंह, त्यांचा कॅमेरामन आणि एक कॅमेरा अटेंडंट जखमी झालेत. तर त्यांचा कॅमेराही फोडण्यात आला. इतकच नाही तर जोधपूरमध्ये IBN नेटवर्कच्या ओबी व्हॅनवरही आसाराम समर्थकांनी दगडफेक केली. आसारामच्या महिला समर्थकांनी जोधपूर आश्रमाबाहेर हा हल्ला केला.

या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय. आसाराम सध्या इंदूरच्या आश्रमात आहेत आणि त्यांना अटक करायला पोलीस इंदूरमध्ये पोहोचले असल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे आता पोलीस काय करतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  • Shiv Deshpande

    Kar Nahi Tar Maramari Kashyala Pahije

close