दिल्ली गँगरेप प्रकरणी अल्पवयीन आरोपीला 3 वर्षांचा शिक्षा

August 31, 2013 4:13 PM0 commentsViews: 572

delhi gan rape31 ऑगस्ट : 31 ऑगस्ट : दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी ज्या आरोपींनी कौर्याची परिसीमा गाठली होती त्या अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवण्यात आलंय. या अल्पवयीन आरोपीला तीन वर्षासाठी बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे. या अल्पवयीन आरोपीवर हत्याचा गुन्हा सिद्ध झालाय. या आरोपीवर बलात्कार आणि हत्येची कलमं लावण्यात आलीय. आज दिल्लीत ज्युवेनाईल कोर्टाने यावर निकाल दिला. मात्र कोर्टाने या खटल्यासंदर्भातील अधिक माहिती देण्यास नकार दिला. तर या नराधमाला झालेल्या शिक्षेवर पीडित तरूणीच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केलीय.

मागील वर्षी डिसेंबर महिन्यात राजधानी दिल्लीत एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी एका 23 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार केला. या नराधमांचं काळकृत्य इथंच थांबलं नाही तर त्या तरूणीवर अत्याचार करून तिचा मृत्यू झाला असं समजून तिला बसमधून फेकून दिलं. मात्र नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटका केलेल्या तरूणीवर अगोदर दिल्लीत हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. मात्र दुदैर्वाने या पीडित तरूणींने 13 दिवस मृत्यूशी लढा देऊन सिंगापूरमधील हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

 

या सहा आरोपींपैकी एक आरोपी हा अल्पवयीन आहे. मात्र याच अल्पवयीन आरोपींने घटनेच्या दिवशी तरूणीवर निर्घृण अत्याचार केले आणि आपल्या सहकार्‍यांनाही अत्याचार करण्यास भाग पाडले. या अल्पवयीन आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान अल्पवयीन आरोपीच वय 18 वरून 16 करण्यात यावं अशी चर्चा सुरू झाली होती मात्र सुप्रीम कोर्टाने अल्पवयीन आरोपीचं वय 18च राहणार असा निर्णय कायम ठेवला. मात्र दिल्लीतील बलात्काराच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटले. या प्रकरणी माजी निवृत्त न्यायाधीश वर्मा समितीची नेमण्यात आली.

 

या समितीने देशभरातून प्रतिक्रिया मागितल्या महिन्याभराच्या संशोधनानंतर वर्मा समितीने आपला अहवाल सादर केला. या अहवालात दुर्मिळातील दुर्मिळ बलात्कार प्रकरणात आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली तसंच 20 वर्ष ते जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. तसंच तरूणींचा पाठलाग करणे, छेडछाड करण्यास अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला. दिल्ली बलात्कार प्रकरणी आज ज्युवेनाईल कोर्टाने अल्पवयीन आरोपीला दोषी ठरवलंय. त्याच्यावर बलात्कार आणि हत्येची कलमं लावण्यात आलीय. या आरोपीला तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार आहे. पण कोर्टाच्या या निर्णयावर पीडित तरूणीच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केलीय. त्या नराधमाला आणखी कठोर शिक्षा जाईल पाहिजे अशी मागणी तिच्या कुटुबीयांनी केलीय.

close