‘साधना’च्या संपादकांना धमकी पत्र

August 31, 2013 2:00 PM0 commentsViews: 672

sadhana31 ऑगस्ट : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर समाजातलं हिंसक तत्त्व शांत झालं नाहीये. साधना मीडिया सेंटरमध्ये पोस्टानं एक पत्र आलंय. या पत्रामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. श्रीराम लागू तसंच श्याम मानव यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहण्यात आलाय.

पत्रात अत्यंत अर्वाच्य भाषा वापरण्यात आलीय. तसंच अंनिसच्या लोकांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आलीय. पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या पोस्ट ऑफीसच्या पेटीत हे पत्र टाकल्याचा शिक्का पत्रावर आहे.

अशा प्रकारांना आपण घाबरत नाही, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राजन दांडेकर यांनी ठणकावून सांगितलं. तसंच हे पत्र पोलिसांना देण्यात येणार आहे.

close