‘जैतापूर’ आंदोलनात फूट, आंदोलन सुरूच राहणार

August 31, 2013 2:10 PM0 commentsViews: 273

jaitapur4431 ऑगस्ट : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या आंदोलनकर्त्यांमध्ये आता दोन गट पडल्याचं चित्र आहे. शुक्रवारी प्रकल्पाला विरोध करणार्‍या जनहित सेवा संघर्ष समितीनं आपलं आंदोलन मागे घेतलं होतं. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी समितीच्या पदाधिकार्‍यांची आणि सदस्यांची बैठक घेतली. आणि त्यानंतर प्रकल्पाच्या कामात सरकारला सहकार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

पण हा निर्णय संपूर्ण जनहित सेवा समितीचा नाही, तो अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांचा वैयक्तिक निर्णय आहे असं जनहित सेवा समितीच्या इतर सदस्यांनी म्हटलंय. आम्ही विचारलेल्या कुठल्याही पर्यावरण विषयक प्रश्नाला सरकारनं समाधानकारक उत्तर दिली नाहीत.

त्यामुळे आमचा लढा सुरुच राहील असं जनहित सेवा समितीनं दिलेल्या या पत्रात म्हटलंय. समितीचे शामसुंदर नार्वेकर, महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अमजद बोरकर, कोकण बचाव समितीचे डॉक्टर विवेक मोन्टेरो आणि अद्वैत पेडणेकर तसंच कोकण विनाशकारी प्रकल्प विरोधी समितीच्या सत्यजित चव्हाण यांनी हे पत्र लिहीलंय. नारायण राणे यांना भेटण्यापूर्वी या शिष्टमंडळानं माडबन आणि पंचक्रोशितल्या लोकांशी संपर्क केलेला नव्हता असंही त्यांनी या पत्रात म्हटलंय.

close