पद्म पुरस्कारावर प्रश्नचिन्ह

January 29, 2009 5:17 PM0 commentsViews: 4

29 जानेवारी जम्मूपद्म पुरस्कारावरून सध्या नवाच वाद समोर आलाय. या पुरस्कारासाठीची नामांकन प्रक्रिया किती पारदर्शक आहे, याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. देशातल्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळणं म्हणजे सन्मानाचं मानलं जातं. पण जम्मू आणि काश्मीरमधल्या एका व्यक्तीला हा पुरस्कार सरकारच्या चुकीमुळे मिळाला आहे. काश्मीरमधले हसमत उल्लाह खान हे क्राफ्ट्स बनवण्याचं काम करतात. पूर्वी ते काश्मिरी शालीच्या निर्यातीचा व्यवसाय करायचे. यंदा मात्र साहित्य, संस्कृती आणि कला याक्षेत्रातल्या पद्म पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस केली गेली. पण, प्रत्यक्षात ते या वर्गवारीत बसतच नसल्याचं सरकारच्या लक्षात आलं, त्याअगोदरच त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठीची घोषणा झाली होती. परंतु आता यावर शिफारस केली नसल्याचं सांगून जम्मू काश्मीर सरकारनं मात्र हात झटकले आहेत.

close