मी ठणठणीत-नाना पाटेकर

August 31, 2013 6:14 PM0 commentsViews: 841

मी एकदम ठणठणीत असून मला अ‍ॅटॅक बिटॅक काही आलेला नाही मीच लोकांना ऍटक देतो अशा आपला स्टाईलमध्ये नानांना खुलासा केला. मला काहीही झाले नाही मी सुखरूप आहे. आज डबिंगच्या कामात व्यस्त होतो त्यामुळे माझा फोन बंद होता. त्यामुळे कुणाला तरी छान गंमत सुचली वाटतं. पण अशा गमतीनं लोकांना त्रास होतो हे त्याला कळत नाही अशी खंतही नानांनी व्यक्त केली. आणि मग काय, अरे कालच मला भेटले होते, कालच मला दिसले होते अशी गमंत सुचते त्यांना अशी खिल्लीही नानांनी उडवली.

तसंच ही लोकं इतकं प्रेम करता की, काय लागतं आयुष्यामध्ये..म्हणून मला नेहमी असं वाटतं, माझ्याकडे काय आहे? तर माझ्याकडे या चाहत्यांचं, या लोकांचं हे प्रेम आहे अजून काही नको. पैसा,अडका जे काही आहे ते इथंच ठेवायचं. ही लोक जे प्रेम करतात अजून काय लागत आयुष्यामध्ये. त्यामुळे या प्रेमापोटी मी मरणार नाही असं नानांनी ठणकावून सांगितलं.

आज दिवसभरात लोकांनी मला रडून फोन केले. नेहमी मी निगरगठ्ठपणे राहते पण मलाच आज गहिवरुन आलं. माझ्या सारख्या माणसावर इतकं प्रेम करतात ही लोकं मला खरचं गहिवरून आलं. आपल्याच मृत्यूच्या बातमीवर नंतर आपल्यालाच जिवंतपणी प्रतिक्रिया ऐकायला मिळतात. आणि आपणं जिवंत म्हटल्यावर ओकाक्षाबोक्शी फोनवर रडायला लागलेली मंडळी पाहून मग मलाच कळेना, आपण इतके प्रेम करण्याचे लायकीचे आहोत असा प्रश्नचिन्ह मनामध्ये पडलाय अशी भावनाही नानांनी व्यक्त केली.

close