मालेगावात 2 कुपोषित चिमुरड्यांचा मृत्यू

August 31, 2013 8:56 PM0 commentsViews: 178

Image img_186412_kuposhan_240x180.jpg31 ऑगस्ट : मालेगाव उपजिल्हा रुग्णालयात दोन कुपोषित बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडलीय. पावणे दोन वर्षांची प्रतिज्ञा वाघ ही बालिका घोडेगावची होती, तर सागर गायकवाड हा बालक म्हाळदे गावातला होता.

आयसीडीएसच्या सर्वेमध्ये मालेगाव तालुक्यात 2047 बालकं कमी वजनाची असल्याचं पुढे आलं होतं. त्यापैकी 16 बालकांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. त्यापैकी या दोन बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

close