..आणि मनसे सैनिक उपोषणाला बसले

August 31, 2013 9:10 PM0 commentsViews: 1117

mns mumbai31 ऑगस्ट : मराठीचा मुद्दा असो अथवा फेरीवाल्यांचा नेहमी ‘खळ्ळ फटॅक’ स्टाईलने आंदोलन करणार्‍या मनसे सैनिकांचं अहिंसेच्या मार्गानं आंदोलन केलंय.

 

मुंबईतील गोरेगावमध्ये मनसेनं पुन्हा एकदा फेरिवाल्यांच्या विरोधात हत्यार उपसलं आहे. पण यावेळी मनसेनं आपली मारझोड स्टाईल बदलत चक्क उपोषण करून गांधीगिरीच्या मार्गाचा अवलंब केलाय. गोरेगाव पश्चिमेच्या एम जी रोडवरच्या फेरीवाल्यांच्या विरोधात मनसेनं हे उपोषण सुरू केलंय.

 

एम जी रोडवरच्या फेरीवाल्यांमुळे लोकांना त्रास होत असल्याची लेखी तक्रारही मनसेने महापालिकेकडे केली होती. पण महापालिकेने काहीच कारवाई न केल्याने हे उपोषण सुरू केल्याचं मनसेतर्फे सांगण्यात आलंय.

close