…तर तुमचा दाभोलकर करू, अण्णांना धमकी पत्र

August 31, 2013 7:35 PM3 commentsViews: 1890

Image img_234002_annahazare344_240x180.jpg31 ऑगस्ट : जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जीवे मारण्याचं धमकीचं पत्र मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. अण्णा तुम्ही देशात लष्करी राजवटीची मागणी करा आणि जर आपण असं केलं नाही तर तुमचा दाभोलकर करू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे. 29 ऑगस्ट रोजी राळेगणसिद्धी येथील अण्णांच्या कार्यालयात हे पत्र पाठवण्यात आलंय.

या पत्रात अण्णांनी लोकपाल विधेयकासाठी उभारलेल्या लढ्याची आठवण करून देत काँग्रेस सरकारने 10 वर्षांपासून सत्ता भोगलीय. पण देशात कुपोषण, भूकबळी गेलेत, भ्रष्टाचार बोकाळलाय गरिबांचा बळी जातोय. आता सशस्त्र क्रांतीची गरज आहे यासाठी तुम्ही लढा उभा करावा अन्यथा तुमचा दाभोलकर करू अशी धमकी या पत्रात देण्यात आलीय.

सध्या अण्णा अमेरिकेच्या दौर्‍यावर असल्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. उद्या अण्णा भारतात येणार असून पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडण्याची शक्यता आहे. या पत्रानंतर राळेगणमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

विशेष म्हणजे डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाट आहे. हल्लेखोरांच्या शोध घेतला जात आहे. पण शुक्रवारी पुण्यात ‘साधना’च्या संपादकांनी धमकी पत्र पाठवण्यात आल्याचं उघड झालं. आणि आज अण्णा हजारे यांना धमकी पत्र पाठवण्यात आलं आहे त्यामुळे हा प्रकार समाजकंटकाचा आहे की कुणी खोडसाळपणा केलाय याचा तपास पोलीस घेत आहे.

 • Rajendra Joshi

  कित्येक दिवस अनेक गोष्टींमुळे backfoot वर असलेल्या कॉंग्रेस पक्षाने आणि सरकारने
  दाभोळकरांच्या खुनानंतर लगेचच परिस्थितीचा फायदा उठवायला सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांसह
  अन्य लोकांनी घटनेनंतर तासा-दोन तासातच दिलेल्या प्रतिक्रियांमधून या कामाला सुरुवात
  झाली. अण्णा हजारे यांना आलेले हे पत्र त्यातील मागणीमुळे विशेषच पोरकट वाटते.
  म्हणजे हे लिहिणारे जे कोणी आहे ते अराजकता आणू पाहणारे, लोकशाहीविरोधी, सरकारविरोधी
  आहे असे दाखवायला या मागणीचा चांगला उपयोग होईल. त्याचबरोबर “तुमचा दाभोलकर करू”
  हे वाक्य अशा सर्व शक्तींचा बागुलबुवा बनवायला उपयुक्त आहे. “सनातनी शक्ती”, “गांधीहत्या
  करणाऱ्या शक्ती” अशा काही बागुलबुवांचा वापर कॉंग्रेसने आपले राज्य मजबूत
  ठेवण्यासाठी नेहेमीच केला आहे. स्वत:ला पुरोगामी समजणाऱ्या बावळट बुद्धिमंतांचा
  पाठिंबा मिळवण्यासाठी या शब्दांना प्रमाणाबाहेर यश मिळत आले आहे.

 • Brave Bravest

  fake publicity stunt

 • http://phiteandharachejale.com/ सुरज महाजन

  पंचनामा पेज ने जितेंद्र आव्हाड आणि युवराज संभाजी राजे यांना धमकी दिली. अशि बातमी वाचली आणि हसू आले. कारण मुळात या बातमी मध्येच मोठा जोक आहे. फेसबुक वरुन दिलेल्या धमकीला हे लोक इतके सिरियस About-Awhad_pix2घेतात. अशा धमक्या फेसबुक वर रोज ढिगाने पडत असतात , पण सर्व सामान्यांचा दृष्टीकोण हाच असतो की फेसबुक हे केवळ करमनुकीचे आणि टाईमपास चे साधन आहे, त्याच्याकडे कोणी सिरियस बघत नाही, आणि अशा माध्यमातुन दिल्या गेलेल्या धमक्या किंवा तत्सम पोस्टस ना किती महत्व द्यायचे हे ज्याचे त्याला कळाले पाहीजे.

  पण जर प्रसिद्धीच हवी असेल तर त्यासाठी कोणत्या ही गोष्टीचे भांडवल करता येते, आणि नेमका तोच प्रकार यावेळी झाला. वादग्रस्त “पंचनामा” पेज वरुन आव्हाड यांना तुमचा दाभोळकर करु अशी धमकी दिली होती म्हणे. आणि ही गोष्ट आव्हाडांनी उचलून धरली. त्या “पोस्ट” आणि पेज वर केस केली, पोलीस अधिकार्‍यांवर प्रेशर टाकले. आता पोलीस आणि सयबर वाल्यांचे धाबे दनानले आणि आयुष्यात कधी फेसबुक ची केस हाताळली नसल्याने सायबर वाल्यांना आणि पोलिसांना ही केस नेमकी कशी हाताळावी हेच कळेना. संशईत म्हणुन पोलिसांनी काही लोकांना पकडले, त्यांच्यावर मानसीक प्रेशर टाकण्याच प्रयत्न केला परंतु चुकिच्या लोकांना पकडून काही उपयोग नाही हे शेवटी पोलिसांच्या सुद्धा लक्षात आले आणि दोनशे पोलीस आणि पन्नास सायबर एक्सपर्ट सलग एक आठवडा कमाला लागुन सुद्धा काती शुन्यच सापडले.

  01
  साध्या भाषेत सांगायचे झाले तर संबंधीत वादग्रस्त पोस्ट कोणत्या आयपी वरुन टाकण्यात आली होती तो आयपी ट्रेस केल्यावर खरा गुन्हेगार किंवा पडद्यामागील सुत्रधार सापडला असता परंतु, संशयीतांवर ताशेरे ओढणार्‍या आव्हाड आणि ब्रिगेडींना नेमके हेच का नको होते हे काही कळाले नाही. संपुर्ण पोलीस अधिकार्‍यांचा वेळ खर्च करुन केवळ संशईतांना त्रास देणे आणि मुळ आरोपीला बगल देणे या पाठीमागचा नेमका काय उद्देश आहे याचे उत्तर ब्रिगेडी अणि आव्हाड देतील का ? की केवळ पब्लिसिटी हवी म्हणुन ब्रिगेड आणि आव्हाड यांनी मिळून स्वत: तशी पोस्ट टाकली व दुसर्‍याच निर्दोश लोकांवर चौकशीचा नांगर फिरवला व नंतर संशयीतांनाच आरोपी असे परस्पर जाहीत करुन ब्रिगेडी पेजेच बोंबा मारू लागले हे कसे काय ? ज्या लोकांना केवळ चौकशी साठी बोलवण्यात आले होते त्यांनीच संबंधीत वादग्रस्त पोस्ट टाकली अशा गैरसमजातून ब्रिगेडी पेजेस नी गाव उठवायला सुरवत केले, हा पोलीस यंत्रणेचा अपमान नाही का ?

  फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्स च्या माध्यमातुन अशाप्रकारे धमकी देणे प्रकार जरी निंदनीय असला तरी त्या प्रकाराचे कोण कसे राजकारन करुन घेते हे महत्वाचे आहे. परंतु काही झाले तरी शेवटी हे मान्य करावेच लागेल की
  १) आव्हाड सारखे नेते आता फेसबुक मधुन टाकल्या जाणार्‍या पोस्ट इतक्या सिरियस घेत आहेत याचा अर्थ पब्लिसिटी साठी मुद्दे कमी पडत आहेत असा घ्यायचा का ?
  २) दोनशे पोलीस आणी पन्नास सायबर वाले सलग एक आठवडा राबुन सुद्धा दोषी सापडत नाही याचा अर्थ पोलीस यंत्रणेचा सायबर क्राईम संदर्भात चौकशीसाठीची दिशा चुकते आहे असे म्हणावे का ?
  ३) ज्यांना केवळ चौकशी साठी बोलावून घेतात त्यांना चार चार दिवस पोलीस चौकशी साठी ठेवून घेतात याचा अर्थ आपण चुकीच्या लोकांना पकडले आणि

close