एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन ‘चौकार’

August 31, 2013 9:54 PM0 commentsViews: 703

asin bilding30 ऑगस्ट : 47 व्या एशियन बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी आजचा दिवस गोल्डन ठरला. स्पर्धेच्या आजच्या दुसर्‍या दिवशी भारताने तब्बल चार गोल्ड मेडल, 2 सिल्व्हर मेडल आणि 1 ब्राँझ मेडल पटकावलं.

भारताच्या गोल्ड मेडलचं खात उघडून दिलं ते 70 किलो वजनी गटातल्या शिव कुमारने, तर पुढच्याच राऊंडमध्ये बॉबी सिंगने भारताला दुसरं गोल्ड मेडल मिळवून दिल. बॉबी सिंगने 75 किलो वजनी गटात हे गोल्ड मिळवलं.

तर 85 किलो वजनी गटात गोल्ड आणि सिल्व्हर अशी दोन्ही मेडल्स भारताच्या नावावर झाली. या गटात बिश्तने गोल्ड तर अंकुर शर्माने सिल्व्हर मेडल पटकावलं. या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत 3 गोल्ड मेडल, 1 सिव्हर मेडल आणि 2 ब्राँझ मेडल्सची कमाई केलीय.

close