आसारामचं पौरुषत्त्व सिद्ध, तब्येतही ठणठणीत

September 2, 2013 3:34 PM1 commentViews: 1512

asaram bapu02 सप्टेंबर : मी नपुसंक आहे, मी लैंगिक अत्याचार करूच शकत नाही असा दावा करणार्‍या आसाराम बापूची वैद्यकीय चाचणीतून पोलखोल झालीय. बापूचं पौरुषत्त्व सिद्ध झालं असून त्याची तब्येतही ठीक असल्याचं सर्टिफिकेटच हॉस्पिटलने दिलंय. तसंच आसारामविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असंही पोलिसांनी सांगितलं.

शनिवारी मध्यरात्री अटक झाल्यानंतर रविवारी पोलिसांनी बापूला त्याच्या आश्रमात घटनास्थळी घेऊन गेले आणि तिथं त्याची चौकशी केली. चौकशी दरम्यान बापूने आपल्यावरील सगळे आरोप फेटाळून लावले. एवढेच नाही तर मी नपुसंक आहे, लैगिंक अत्याचार करूच शकत नाही असंही त्याने पोलिसांना सांगितलं. बापूची ही वाणी ऐकून पोलीस ही चक्रावून गेले. जर बापू नपुसंकच म्हणत असेल तर पोटन्सी टेस्टच करण्याचा निर्णय घेतला.

अखेर बापूच्या चमत्कारासारखाच त्यांचा दावाही खोटा ठरला. वैद्यकीय चाचणीत तो चौकशीसाठी फिट असल्याचं स्पष्ट झालंच, तसंच त्याची पोटन्सी टेस्टही घेण्यात आली त्यात त्याचं पौरुषत्व सिद्ध झालं असून आसाराम आजारी नसल्याचं सिद्ध नसल्याचं निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय.आसारामवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्या मदतनीसांची दिवस अखेर चौकशी केली जाईल असं पोलिसांनी सांगितलंय.

तसंच आसाराम चौकशीदरम्यान सहकार्य करत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. त्यानं स्वतःविरुद्धचे सर्व आरोप फेटाळलेत. या प्रकरणी आतापर्यंत फक्त आसारामलाच अटक करण्यात आलीये. मात्र, आणखी काही जणांना अटक केली जाऊ शकते, असं पोलिसांतर्फे सांगण्यात येतंय. आज आसाराम बापूची एक दिवसाची पोलीस कोठडी आज संपतेय ती वाढवून मिळावी यासाठी पोलीस प्रयत्न करण्याची शक्यता आहे.

 • rajaharishchandra

  बाबा दोषी आहे कि नाही ते बाबाला आणि त्या मुलीला माहित ? न्यायव्यवस्था
  शोधेल ? काही हाती लागेल ?….. पण कोणी अल्पवयीन मुलगी असं का
  वागेल?…कोणी पालक मुलगी एकटी ठेवतील/ दुर्लक्ष करतील ? बाबा असून त्याचा
  त्याच्या मनावर सय्यम नाही? त्याची हिस्टरी काय सांगते कि तो कसा आहे? मग
  आता अटक झाली ……नंतर केस चालणार……….बाबा जामिनावर
  बाहेर……..दोन वर्षानंतर मुलगी बदलेल …… साक्षीदार फुटतील
  ………केस ढिल्ली पडणार ………. नंतर लोक विसरणार………..नंतर
  मुलगी गायब…….. केस गायब……. निष्पन्न काहीच नाही ?……….दोष
  कुणाचा?……..बाबाचा ? मुलीचा ? न्यायव्यवस्थेचा ? पोलिसांचा ? मिडीयाचा ?
  समाजाचा ? कि बाबाला ज्यांनी मोठा केला त्याचा ? …. पूर्वी पासून असाच
  चालत आले आहे … किती उदाहरणे ……… भारतात फक्त दोनच लोक सुखी
  आहेत…… १. मोठा माणूस- हरण्यासाठी खूप काही २. छोटा माणूस – हरण्यासाठी
  काही नाही. मिडल क्लास इज मिडल क्लास …… समाजाची भूमिका – तुम्ही पुढे
  चाला मी कपडे सांभाळतो ! नंतर नावे ठेवतो ! मी नाही तो तो !

close