जळगावात सुरेश’दादा’च, मनसे12 जागांवर विजयी

September 2, 2013 3:51 PM0 commentsViews: 4204

Image img_237772_sureshjainjalgaon_240x180.jpg02 सप्टेंबर :जळगाव शहराची सत्ता आपल्या हाती ठेवण्यात आमदार सुरेश दादा जैन अटकेत असतानाही यशस्वी झाले आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीत सत्ताधारी खान्देश विकास आघाडीला 33 सर्वाधिक जागा मिळाल्यात. अर्थात हे निर्विवाद बहुमत नसल्यानं त्यांना कोणाची तरी मदत घ्यावी लागणार आहे.

 

कोट्यावधीचे गैरव्यवहार ,बहुचर्चित घरकुल घोटाळा आणि कर्जबाजारी महानगरपालिका हे खरं तर महापालिकेच्या सत्ताबदलासाठी पुरेशी कारणं होती. पण सुरेश दादा जैन यांच अटकेत असणं जळगावकरांसाठी सहानुभूती मिळवणारं ठरलंय. सुरेश जैन यांच्या अनुपस्थितीत निवडणुकीची सूत्र त्यांचे बंधू रमेश जैन यांच्याकडे होती.

 

विरोधकांमधली फूट हे देखील खान्देश विकास आघाडीच्या यशाचं कारण आहे. काँग्रेसला या निवडणुकीत खातंही उघडता आलं नाही. तर राष्ट्रवादीसाठी ही उपमुख्यमंत्री पासून तर गृहमंत्र्यांचा सभा झाल्या पण त्यांच्या 15 वरून 11 झाल्यात. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण सुरेश जैन यांच्यापुढे काही चाललं नाही. त्यांना 15 जागांवर समाधान मानावं लागलं. सर्वात मोठं यश हे मनसेच. मनसेनं तब्बल 12 जागा जिंकल्यात. जळगावच्या सभेत दादांच्या सभेत टाळ्या मिळवणारे राज ठाकरे दादांसोबत जातील का. हा खरा मुद्दा आहे. खरंतर सत्तेपर्यंत पोहचण्यासाठी खान्देश विकास आघाडीला फक्त पाचचं जागांची गरज आहे. ही गरज अपक्ष आणि इतरांची भूमिका निर्णायक बनली आहे.

जळगावचा आखाडा

  • एकूण जागा: 75
  • बहुमताचा आकडा: 38

खान्देश विकास आघाडी: 33

  • - भाजप: 15
  • - मनसे: 12
  • - राष्ट्रवादी: 11
  • - इतर: 4

चंद्रपुर नगरपालिकेवर भगवा

तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. 27 जागांपैकी शिवसेनेला आता बहुमतासाठी फक्त एका जागेची गरज आहे. शिवसेना सध्या 13, बसपा 3, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2, स्वतंत्र भारत पक्ष 1, भारिप बहुजन महासंघ 3, सीपीआय 2 तर अपक्ष एका जागी विजयी झालेत. हा दणदणीत विजय मिळवत शिवसेनेनं सलग तिसर्‍यांदा भद्रावती महापालिका राखलीये. तर संजय देवतळेंना हा धक्का मानला जातोय.

 

close