दाभोलकरांच्या दुसर्‍या मारेकर्‍याचं रेखाचित्र लवकरच जारी?

September 2, 2013 2:16 PM0 commentsViews: 189

narendra dabholkar02 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी आणखी दोन साक्षिदार माहिती देण्यासाठी पुढं आले असून त्यांच्या मदतीनं दुसर्‍या मारेकर्‍याचं रेखा चित्रही तयार करण्यात येणार आहे. आज सायंकाळपर्यंत ते रेखा चित्र तयार होईल.

तर आणखी सात ठिकाणांचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालंय पण ते फुटेजही अस्पष्ट आहे त्यामुळे पोलिसांच्या अडचण वाढल्यात.

उद्या दाभोलकरांच्या खुनाला दोन आठवडे पूर्ण होतील, मात्र अजुनही मारेकरी मोकाट आहे. पुणे पोलिसांना त्यांना पकडता तर आलंच नाही मात्र त्यांच्याबद्दलचे ठोस पुरावेही मिळाले नाही. पोलिसांची 19 पेक्षा जास्त पथकं घटनेची चौकशी करत आहेत.

close