पेट्रोल पंप 24 तास सुरूच राहणार, मोईलींचा प्रस्ताव फेटाळला

September 2, 2013 2:23 PM0 commentsViews: 163

Image img_204362_petrolcompani_240x180.jpg02 सप्टेंबर : एकीकडे पेट्रोल-डिझेलच्या दरात होत असलेली वाढ आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी इंधनाची बचत व्हावी म्हणून रात्री आठ ते सकाळी आठ या कालावधी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा प्रस्ताव पेट्रोलियम मंत्री विरप्पा मोईली यांनी केंद्रापुढे ठेवला होता. पण मोईलींचा हा प्रस्ताव पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी साफ फेटाळून लावला.

पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि अर्थमंत्री पी. चिदंबरम हे दोघेही यासाठी राजी नव्हते अशी माहिती मिळतेय. पेट्रोल पंप रात्रीच्या वेळी बंद ठेवण्याच्या कल्पनेला लोकांनी जोरदार विरोध केला होता. तसंच सोशल नेटवर्किंग साईट्सवरूनही या प्रस्तावाची जोरदार खिल्ली उडवण्यात आली होती.

मात्र पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या विरोधामुळे मोईली यांनी सूर बदलला. आयबीएन नेटवर्कचे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई यांच्या बातचीत करताना मोईलींनी आपल्या प्रस्तावावरून पलटी मारली. हा माझा प्रस्ताव नव्हता, लोक असे सल्ले सुचवत असतात याचा असा अर्थ नाही की ते लगेच आम्ही लागू करू असं स्पष्टीकर ण मोईलींनी दिलंय. तसंच पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी आणि इंधन बचतीवर उपाय योजनेवर चर्चा सुरू असून त्याबद्दल 16 सप्टेंबरला घोषणा केली जाणार आहे अशी माहितीही मोईलींनी दिली.

close