चंद्रपूर नगरपालिकेवर भगवा

September 2, 2013 5:54 PM0 commentsViews: 378

चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती नगरपालिकेच्या सर्व जागांचे निकाल जवळपास जाहीर झाले आहेत. 27 जागांपैकी शिवसेनेला आता बहुमतासाठी फक्त एका जागेची गरज आहे. शिवसेना सध्या 13, बसपा 3, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2, स्वतंत्र भारत पक्ष 1, भारिप बहुजन महासंघ 3, सीपीआय 2 तर अपक्ष एका जागी विजयी झालेत. हा दणदणीत विजय मिळवत शिवसेनेनं सलग तिसर्‍यांदा भद्रावती महापालिका राखलीये. तर संजय देवतळेंना हा धक्का मानला जातोय.

close