कोपरीत भाजप विजयी

September 2, 2013 6:01 PM0 commentsViews: 108

ठाण्याच्या कोपरीतल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या रेखा पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अरूणा भुजबळ यांचा पराभव केलाय. या निवडणुकीकडे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून पाहिलं जात होतं. रेखा पाटील यांना 5 हजार 497 मतं पडली. तर काँग्रेसच्या अरूणा भुजबळ यांना 2 हजार 276 मतं पडली. ठाणे महापालिका पोटनिवडणूक मुंब्रा प्रभाग क्रमांक 57 ब राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विश्वनाथ भगत विजयी झाले आहेत. विश्वनाथ भगत यांना 3,332 मतं पडली तर सपाचे फारूक कयाम यांना 1002 मतं पडली. ठाणे महापालिकेच्या कोपरी येथील प्रभाग क्रमांक 51 अ आणि मुंब्रा येथील प्रभाग क्रमांक 57 ब या दोन प्रभागांमध्ये पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या निवडणुकीसाठी कोपरीमध्ये 45.22 टक्के इतके मतदान झाले होते. तर मुंब्रामधील निवडणुकीत 35 टक्के मतदान झाले होते.

close