दाभोलकरांच्या दुसर्‍या मारेकर्‍याचं रेखाचित्र प्रसिद्ध

September 2, 2013 6:39 PM1 commentViews: 581

dabholkar marekari02 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दाभोलकरांच्या खुनाला आता दोन आठवडे होत आहेत. आज या प्रकरणी दुसर्‍या मारेकर्‍याचं रेखाचित्र पुणे पोलिसांनी आज सोमवारी जारी केलंय. हा संशयित 25 ते 28 वयोगटातला असून डोक्यात टोपी घालतो.

 

या प्रकरणी पोलिसांनी ज्याना कुणाला या प्रकरणाबद्दल काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर दोन साक्षीदार पुढे आलेत. त्यांच्या माहितीवरून हे स्केच बनवण्यात आलंय. तसंच घटनास्थळांच्या आसपासच्या 7 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमध्ये हे आरोपी कैद झालेत.

 

पण, फुटेज अस्पष्ट आहे. फुटेज तपासण्याचं काम लंडनमध्ये सुरू आहे. दरम्यान, याप्रकरणी महत्त्वाची माहिती मिळालीय. त्यामुळे मारेकर्‍यांचा छडा नक्की लावू, असा विश्वास पुणे पोलिसांनी व्यक्त केलाय. पण, त्यासाठी किती काळ लागेल, याबद्दल सांगता येत नाही, असंही पुण्याचे डीसीपी बनसोडे यांनी सांगितलंय.

 

20 ऑगस्ट रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर मॉर्निंग वॉकसाठी गेले असता दुचाकीवर आलेल्या दोन हल्लेखोरांनी दाभोलकर यांच्यावर पाठीमागून गोळीबार केला. दाभोलकर यांच्या खुनानंतर दुसर्‍या दिवशी प्रत्यक्षदर्शीची माहितीवरून पोलिसांनी एका संशयित मारेकर्‍यांचं रेखाचित्र प्रसिद्ध केलं होतं.

 

पहिल्या मारेकर्‍यांचं रेखाचित्र

sketch

  • Dilip Tayade

    police ne marekarawar 10 lakh che baxis ghoshit karave aani tyala gujrat madhe shodave tar to sapdel kay sangave mastar mind ne tyanna pn marun takle asel tr sarkar napusak aahe 10 lakh bakshish ghoshit kara ……… dilip tayade aiyf amravati

close