पुतण्याची काकांवर मात, धनंजय मुंडे विजयी

September 2, 2013 7:47 PM1 commentViews: 1447

dhanjay vs gopinath munde02 ऑगस्ट : विधान परिषदेच्या एक जागेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी विजय मिळवत काकांना मात दिलीय. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा दणदणीत विजय झालाय. धनंजय यांना 165 मतं मिळाली, तर पराभूत अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडे यांना 106 मतं मिळाली. धनंजय मुंडेंनी मोठ्या फरकाने हा विजय मिळवला.

धनंजय यांचा विजय जरी झाला असला तरी पृथ्वीराज काकडे यांनी आघाडीची दहा मते फोडलीय. धनंजय मुंडे विरुद्ध पृथ्वीराज काकडे अशी ही लढत असली तरी खरी लढत ही गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी होती. वर्षभरापूर्वी काकांच्या विरुद्ध बंड पुकारून धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांनी तातडीने आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर ही पोट निवडणूक घेण्यात आली.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने वंजारी समाजाचा उमेदवार बीडमधून दिला होता तर गोपीनाथ मुंडेंनी मराठा समाजाचा उमेदवार बारीमती मधून दिला होता. त्यामुळे ही लढत बीड विरुद्ध बारामती अशीही होती. धनंजय मुंडे यांचा विजयाचा संदेश हा आता बीड मतदार संघात जाणार हे स्पष्ट आहे. आज विधान परिषदेबाहेर धनंजय मुंडे यांच्या हजारो समर्थकांनी मोठी गर्दी केलीय. एका प्रकारे धनंजय मुंडेंनी यातून शक्तीप्रदर्शन केलंय.

धनंजय मुंडे यांचे काका गोपीनाथ मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी भाजपची उमेदवारी मागे घेऊन अपक्ष काकडेंना पाठिंबा दिला होता. तसंच धनंजयविरोधात मतदान करण्यासाठी आघाडीच्या आमदारांना अप्रत्यक्ष आवाहनही केलं होतं. या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन कृष्णकुंजवर भेट घेतली. या भेटीनंतर राज यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे ठरल्याप्रमाणे मनसेचे 12 आमदार तटस्थ राहिले. अत्यंत चुरशीच्या लढतीत काकांवर पुतण्याने मात केलीय.

 • rajaharishchandra

  ज्याने मोठा केला त्याचाच विरोधात गोष्टी करून फक्त सत्ता काही दिवस मिळू
  शकेल.
  पण ज्या ठिकाणी हे सगळं घडतंय तेथे विश्वास अहर्ता राहणार नाही…..छोटा
  मासा मोठ्यासकट लयास जाईल किवा छोट्याला आपली जागा कळेल.
  धनंजय ला बोलता येत का ?…… स्वताचा मतदार संघात विकास केलाय
  का?…….उगा नाही त्याच्या खांद्यावर बसून जोर करतोय पण खांद्यावरून
  पडल्यावर ?…… ना घर का ना घाट का ! दुश्मन अनाज का !

close