‘एमसीए’ला सरकारचा पाठिंबा आहे का? -उद्धव

September 2, 2013 10:00 PM0 commentsViews: 151

udhav on mca02 सप्टेंबर : कांदिवलीच्या एमसीएला मुंबई महापालिकेनं ऑक्युपेशन सर्टिफिकेट दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलीये. राज्य सरकार अधिकारांचा गैरवापर करुन अशा प्रकारे परवानगी घेत असेल तर या विरोधात लढा देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. तसंच राज्य सरकार अशा संस्थेला परवानगी देत असले तर त्या संस्थेतील गैर कारभाराला पाठिंबा आहे का? असा सवालही उद्धव यांनी केला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कांदिवली इथल्या बांधकामाला मुंबई महानगरपालिकेनं ओ सी देउ नये अशी भूमिका शिवसेनेनं घेतली होती आणि आंदोलनही केलं होतं. या विरोधात राष्ट्रवादीच्या आमदारांनी पावसाळी अधिवेशनात आवाज उठवला होता. त्

यावेळी राज्य सरकारनं महापालिकेला फटकारलं होतं. आणि नियमांच उल्लंघन झालं नसेल तर ऑक्युपेशन सट्रिफिकेट अडवून धरण्याच कारणंही विचारलं. आता महापालिका प्रशासनानं एमसीएला सट्रिफिकेट दिलं. ज्या प्रशासनानं हे सट्रिफिकेट दिलं त्या महापालिकेत सेनेचीच सत्ता आहे. तर एमसीए साठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे हा विषय अधिक चर्चेत आला होता.

close