ऑफिसमध्येही रॅगिंग, तरूणीची आत्महत्या

September 3, 2013 3:26 PM2 commentsViews: 2787

nasik raging03 सप्टेंबर : आतापर्यंत आपण कॉलेजमधल्या रॅगिंगच्या बातम्या ऐकल्या होत्या. पण आता ऑफिसच्या रॅगिंगचा भयानक प्रकार पुढे आलाय.  नाशिकमध्ये एका तरूणींने आपल्या सहकार्‍यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीय. या प्रकरणी चार तरूणींसह 6 तरूणांना अटक करण्यात आलीय.

 

नाशकातील बॉश कंपनीमध्ये प्रशिक्षाणार्थी म्हणून काम करणार्‍या 19 वर्षीय प्रणाली रहाणे या मुलीने सहकार्‍यांच्या रॅगिंगला कंटाळून राहत्या घरात हाताच्या नसा कापून व गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येच्या वेळी तिने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये सहकार्‍यांची नावं लिहिली होती.

 

यावरून इंदिरानगर पोलिसांनी 4 तरूणी व 6 तरूणांना अटक केली आहे. त्यांच्यावरती रँगिग अँक्ट अंतर्गत आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रणाली ही अतिशय हुशार मुलगी होती. बंगलोरमध्ये झालेल्या टर्नर या परिक्षेत भारतात सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला होता.

  • disqus_NKuE6caZar

    salyana bhar caukat fashi dili pahije

  • disqus_NKuE6caZar

    give them fashi

close