दाभोलकरांच्या खुनाची सीबीआय चौकशी करा-मुंडे

September 3, 2013 2:00 PM0 commentsViews: 197

Image img_239542_munde454_240x180.jpg03 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज दोन आठवडे पूर्ण झालेत. मात्र, अजूनही तपासामध्ये फारशी प्रगती झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केली. या प्रकरणी आतापर्यंत दोन्ही संशयितांची दोन्ही रेखाचित्रं तयार करण्यात पोलिसांना यश मिळालंय.

 

सात सीसीटीव्ही कॅमेरांमध्ये हल्लेखोर दिसल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. पण त्यामध्ये ते स्पष्ट दिसत नाहीत. तर दुसरीकडे , डॉ. दाभोलकर यांच्या खून प्रकरणाच्या चौकशीत राज्यपालांनी लक्ष घालावं, या मागणीसाठी राज्यातल्या पुरोगामी संघटनांचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.

 

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात काहीही प्रगती झालेली नाही, त्यामुळे राज्यपालांनी या प्रकरणात स्वत: लक्ष घालावं अशी मागणी ते करणार आहेत.

close