फ्रायडे रिलीज

January 30, 2009 6:46 AM0 commentsViews: 2

30 जानेवारीगेल्या आठवड्यात रिलीज झालेला स्लमडॉग मिलेनियर बर्‍याच जणांचा बघून झाला असेल, आता या आठवडयापासून स्लमडॉगला तगडी स्पर्धा असेल. कारण बॉलिवूडचे दोन मोठे सिनेमे रिलीज होतायत, सिनेमा आणि क्रिकेट हे भारतीयांचे वीक पॉइंट्स आणि याच विषयांवरचे हे दोन सिनेमे आहेत आणि त्याशिवाय हॉलिवूडचे दोन इंटररेस्टींग सिनेमेही आहेतच. या वीकेंडसाठी सिनेमांच्या ऑप्शनबद्दल एक रिपोर्ट.लक बाय चान्स हा या आठवड्यातला बॉलिवूडचा मोठा सिनेमा. झोया अख्तरनं पहिल्यांदाच दिग्दर्शन केलंय. फरहान अख्तर आणि कोंकणा सेन यांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत. एक स्ट्रगलर ऍक्टर फिल्म स्टार बनण्यासाठी मुंबईत येतो अशी ही कथा आहे. शाहरुख खान आणि आमीर खान असे स्टार्सही यात आहेत पण पाहुण्या भूमिकेत. भरपूर ग्लॅमर असलेला हा सिनेमा किती लकी ठरतोय ते पाहायचं.लक बाय चान्स हा सिनेमा फिल्म इंडस्ट्रीवरआहे, तर व्हिकट्री आहे क्रिकेटवर. मुख्य भूमिकेत आहे हरमन बावेजा..नंबर वन बनलेल्या एका क्रिकेटरची ही कथा. त्याच्या आयुष्यातले चढउतार दिग्दर्शक अजितपाल मंगतने दाखवलेत. सोबत अमृता राव, अनुपम खेरही आहेत. हरमन बावेजालाही एका व्हिक्ट्रीची गरज आहेच. हॉलिवूडचे दोन सिनेमे रिलीज होत आहेत. पहिला आहे एलेजी. फिलिप्स रॉथ्सच्या डाइंग ऍनिमल या कादंबरीवर हा सिनेमा आहे. या कादंबरीला पुलित्झर ऍवॉर्ड मिळालं होतं..इसाबेल कॉक्झेटचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा म्हणजे एक प्राध्यापक आणि एका स्त्रीची प्रेमकथा आहे. सोन्जा बेनेट, पॅट्रिका क्लार्कसन, पेनेलोप क्रुझ यांच्या भूमिका आहेत. दुसरा हॉलीवूड सिनेमा आहे बेडटाइम स्टोरीज. हा आहे एक कौटुंबिक विनोदी सिनेमा. सिनेमातला हिरो आपल्या भाच्यांना रात्री झोपताना कथा सांगतो आणि त्या खर्‍या व्हायला लागतात. या सिनेमाला ऍडम शँकमनचं दिग्दर्शन आहे. ऍडम सँडलर, केरी रुसेल या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

close