जटीबुटी देणार्‍या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल

September 3, 2013 7:21 PM0 commentsViews: 293

03 सप्टेंबर : आजारी लोकांना राख,जडीबुटीचं औषध देणार्‍या एका भोंदूबाबा गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं कळताच या भोंदूबाबाने पळ काढलाय. यवतमाळ जिल्ह्यात कळंब तालुक्यात सुकाली या गावात ही घटना घडली. या भोंदूबाबाविरोधात पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. नागपूर येथील रहिवासी अतुल नाईक यांची बहिण वर्धा येथे वास्तव्यास आहे. गेल्या काही महिन्यांपासून ती दुर्धर आजाराने त्रस्त आहे. तिला अजित चौधरी नावाच्या इसमाने सुकलीच्या विनायक जाधव या भोंदू बाबाकडे उपचारासाठी नेले. जिथे या बाबाचा मोठा मठ आहे. या बाबाने जडीबुटीचं औषध या महिलेला दिलं. पण या औषधाचा कोणताही उपयोग न होता तिची प्रकृती उलट जास्त बिघडली. आपली फसवणूक झाले हे लक्षात येताच या महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणी कळंब पोलीस याबतीत अधिक तपास करीत आहे. या बाबासह अजित चौधरी हे दोनही आरोपी फरार आहेत. या भोंदूबाबाचे भक्त हे येथील राजकीय पुढारीही आहेत. आणि या बाबाचं प्रस्थ पुण्या-मुंबईपर्यंत पोहचलं आहे.

close