महाराष्ट्रातली दोन विद्यापीठं बिहारनं बोगस ठरवली

January 30, 2009 9:01 AM0 commentsViews: 13

30 जानेवारीमाधव सावरगावे, प्रशांत कोरटकरबिहार सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नुकतीच देशातील बोगस विद्यापीठांची यादी प्रकाशित केली. त्यात महाराष्ट्रातील औरंगाबादच्या डॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि नागपूरच्या तुकडोजी महाराज विद्यापीठांचा समावेश आहे. या माहितीनंतर विद्यार्थांमध्ये संताप आहे तर औरंगाबाद विद्यापीठ बिहार सरकारला न्यायालयात खेचण्याच्या तयारीत आहे. औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठांना बिहार सरकारन चक्क बोगस ठरवलं आहे. इथे शिक्षण घेणा-या विद्यार्थांच्या पदव्यांवरच बिहार सरकारनं प्रश्न उपस्थित केला आहे. नुकत्याच प्रसिध्द केलेल्या 68 बोगस विद्यापीठ आणि कॉलेजेसच्या यादीत या विद्यापीठांची नाव आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. नागपुरातील बीपीएड च्या विद्यार्थ्यांना बिहारमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश नाकारण्यात आला होता. मधल्या काही प्रकरणांनंतर , नागपूर विद्यापीठ आपली प्रतिमा सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र नागपूर बरोबरच औरंगाबाद च्या आंबेडकर विद्यापीठाच नावही बिहार सरकारच्या यादीत आलय. या दोन्ही विद्यापीठांत ग्रामीण भागातून येणा-या विद्यार्थांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बिहार सरकारनं प्रसिध्द केलेल्या यादीनंतर , आता औरंगाबाद विद्यापीठ बिहार सरकारला कायदेशीर नोटीस पाठवणार आहे.

close