निवृत्तीचा विचार नाही-सचिन

September 3, 2013 9:08 PM0 commentsViews: 882

03 सप्टेंबर : गेल्या 23 वर्षांपासून मी क्रिकेट खेळतोय. मी नेहमी एकच विचार केलाय आपण जोपर्यंत त्या स्थानापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये. मी त्या मार्गावर आहे पण अजून तिथे पोहचलो नाही. त्यामुळे सध्या निवृत्तीचा विचार नाही. ती वेळ आल्यावर मी स्वत: जाहीर करीन असं स्पष्ट मत मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केलं आणि आपल्या निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम लावला. तसंच माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीत देशवासीयांनी माझ्यावर खूप प्रेम केलं त्यांचा मी खूप आभारी आहे त्यांच्या प्रेमामुळे मी इथं पर्यंत पोहचू शकलो. पण माझ्या मनात काय आहे हे मीच स्पष्ट करेन तुम्हीही मला समजून घ्या अशी विनंतीही सचिनने केली. मुंबईत सचिन तेंडुलकरनं आज बीएमडब्लू (BMW) ची नवीन सीरिज लाँच केली. यावेळी सचिननं सीएनबीसी (CNBC) आवाजला विशेष मुलाखत दिली. यावेळी सचिननं क्रिकेट, आपल्या गाड्यांचं प्रेम, म्युझिक या सर्व विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्यात.

close