सीरियावर युद्धाचे काळे ढग, अमेरिकेची मिसाईल टेस्ट

September 3, 2013 9:45 PM0 commentsViews: 1609

syriya attack03 सप्टेंबर : सीरियावर युद्धाची ढग जमू लागले आहे. आज अमेरिका सीरियावर हल्ला करण्याची शक्यता आणखी बळावलीय. इस्त्रायलनं अमेरिकेबरोबर संयुक्तपणे मिसाईल टेस्ट केलीय.

 

इस्त्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी याची कबुलीही दिलीय. रशियानंही यापूर्वी सीरियावर दोन मिसाईलसदृश गोष्टींचा हल्ला झाल्याचा दावा केला होता. भूमध्य समुद्राच्या मध्य भागातून हा हल्ला केला गेल्याचा दावा रशियानं केलाय. अमेरिकेनही या दाव्याचं खंडन केलंय.

 

पण, हल्ला झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी धमकी सीरियाचे अध्यत्र असाद यांनी दिलीय. पण, मिसाईल टेस्टमुळे अमेरिका सीरियावर हल्ल्यासाठी तयारी करत असल्याचा संदेश गेल्यानं शेअर बाजारावर त्याचा परिणाम झाला.

 

भारतीय बाजारात सेन्सेक्स साडे सहाशे अंकांनी कोसळला. तर रूपयाची किंमतही एका डॉलरमागे 68 रुपयांच्या खाली गेलाय. पण, भारत सीरियावर हल्लाच्या विरोधात असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय.

close