मदरशांसाठी 9 कोटी 99 लाखांचा अनुदान मंजूर

September 4, 2013 4:36 PM1 commentViews: 553

madarsha04 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक मतदारांना खूश करण्यासाठी अल्पसंख्याक विभागाने अनुदानाची तिजोरी उघडली आहे. राज्यातल्या निवडक 200 मदरशांना आर्थिक मदत देण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. एकूण 9 कोटी 99 लाखांची ही योजना आहे.

 

राज्यात 1889 मदरशे आहेत, यापैकी 200 मदरशांना पहिल्या वर्षी अनुदान देण्यात येणार आहे. मदतीसाठी मदरशांची नोंदणी असणं आवश्यक असून विद्यार्थ्यांना 10वीची परीक्षा देणं बंधनकारक आहे. ही मदत पायाभूत सुविधा, विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि शिक्षकांचं मानधन यासाठी देण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्यानं मदरशांच्या संख्येत वाढ होणार असल्याचं सांगण्यात येतंय.

 

3 जून 2013 पर्यंत ज्या मदरशांनी नोंदणी केलीय त्याना याचा फायदा होणार आहे. मदरशातील डी.एड पदविधारक शिक्षकांना दरमहा 6 हजार रुपये तर बी.एडशिक्षकांना हजार रूपये मानधन मिळणार आहे.पण प्रत्येक मदरशांमध्ये फक्त तीनच शिक्षकांना याचा फायदा मिळणार आहे. तसंच शाळेत शिक्षण घेणासाठी मदरशातील 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 4 हजार रूपये तर 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना 5 हजार रूपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.

 

मदरशांना मिळणारी मदत कोणकोणत्या कारणांसाठी खर्च होईल?

 • - मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी 10 कोटी रुपयांची मदत
 • - इमारतींचं नुतनीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहं, प्रयोगशाळांसाठी प्रत्येकी 2 लाख रुपये
 • - ग्रंथालयासाठी एकरकमी 50 हजार रुपयांचं अनुदान
 • - विज्ञान, गणित, मराठी, इंग्रजी शिकवण्यासाठी 3 शिक्षकांना प्रत्येकी आठ हजार रुपयांचं अनुदान
 • - मदरशांमध्ये राहणार्‍या 9 वी, 10 वीच्या 600 विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी 4 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
 • - अकरावी, बारावी आणि ITIमधल्या 400 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपयांची शिष्यवृत्ती
 • - जे मदरशे विद्यार्थ्यांना 10 वीच्या परीक्षेला बसवत नाहीत, त्यांचं अनुदान बंद होणार
 • Adv. Meenal

  i will oppose. 1st r Muslims r in minority in India ? NO.
  2ndly if Pakistan never provide such protection y r u ?
  3rd y your own Hindus does not have such protection ?

close