व्हिनस भगिनी ऑस्ट्रलियन ओपन महिला डबल्स जिंकल्या

January 30, 2009 8:26 AM0 commentsViews: 1

30 जानेवारी, सिडनीऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांनी महिलांच्या डबल्समध्ये बाजी मारली आहे. डॅनिएला हँटुकोवा आणि अई सुगियामा जोडीचा त्यांनी सरळ सेट्समध्ये 6-3, 6-3 असा पराभव केला. मोठ्या रॅली खेळण्याचं सेरेनाचं कौशल्य आणि व्हिनसचे पासिंग शॉट्स यांच्या जोरावर पूर्ण मॅचभर विल्यम्स भगिनींनी वर्चस्व गाजवलं. सेरना आणि व्हिनसने मिळून आतापर्यंत आठ ग्रँडस्लॅम डबल्स स्पर्धा जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियन ओपनमधलं त्यांचं हे तिसरं विजेतेपद आहे.

close