भूपती-सानिया ऑस्ट्रेलियन ओपन्सच्या अंतिम फेरीत

January 30, 2009 8:31 AM0 commentsViews: 5

30 जानेवारी, सिडनीमहेश भूपती आणि सानिया मिर्झा या भारतीय जोडीने मिक्स्ड डबल्सच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमी फायनल मॅचमध्ये त्यांनी इव्हिटा बेनेसोव्हा आणि ल्युकास लॉही या जोडीचा 6-4, 6-1 ने पराभव केला. सानिया आणि भूपती यांचं खेळातलं समन्वय वाखाणण्यासारखं होतं. 54 मिनिटातच त्यांनी प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडवला. आता उद्या फायनलमध्ये त्यांची गाठ अँडी रॅम आणि नतालिया दिची यांच्याशी पडेल. भूपतीने मिक्स्ड बरोबरच पुरुषांच्या डबल्समध्येही फायनलमध्ये धडक मारली आहे.

close