‘जादूटोणा’ वटहुकूमानुसार 2 भोंदूबाबांवर गुन्हा दाखल

September 4, 2013 8:18 PM1 commentViews: 564

jadu tona04 सप्टेंबर : डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर राज्य सरकारने जादूटोणा विरोधी विधेयकाचा वटहुकूम जारी केला. आणि या वटहुकूमानुसार नांदेडमध्ये दोन भोंदूबाबांविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. गंडा, ताबीज देवून, असाध्य रोग बरे करण्याच्या जाहिराती देवून या भोंदूबाबांनी आपलं दुकान मांडलं होतं. त्यांच्यावर सध्याच्या कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुकत्याच लागू झालेल्या जादुटोणा विरोधी वटहुकूमाच्या कलम -3 (2) नुसारही गुन्हा दाखल झालाय.

 

अशा प्रकाराचा गुन्हा दाखल करण्याची राज्यातली ही पहिलीच घटना आहे. ऍडिशनल एस.पी. तानाजी चिखले यांनी तसा आदेशच काढलाय. त्यानुसार डी.वाय. एस.पी. विजय कबाडे यांनी हा गुन्हा दाखल केलाय. या सर्व प्रकाराचा अंनिसचे कार्यकर्ते आणि पत्रकार धर्मराज हल्लाळे यांनी पाठपुरावा केला. मुळचे उत्तर प्रदेशातले असलेले साहिल खान आणि अमीरूद्दीन अशी या भोंदुबाबांची नावं आहेत.

 

एड्स आणि कॅन्सर सारखे असाध्य रोग बरं करण्यासाठी तावीजही देत असतं. या दोघांकडून जादूटोण्यासाठी लागणारं साहित्यही पोलिसांनी जप्त केलं. जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम 3 (2) नुसार त्यांना कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. तसंच 5 हजारापासून ते 50 हजारापर्यंत दंडाचीही तरतूद करण्यात आलीय.

  • vijayalaxmi

    bare changali aadai chadali

close