साखर कारखानांची व्यावसायिकांच्या दावणीतून सुटका

September 4, 2013 9:44 PM0 commentsViews: 143

Image img_121002_cane_sugar_3900-_240x180.jpg04 सप्टेंबर : यापुढं सहकारी साखर कारखाने खासगी व्यावसायिकांना विकले जाणार नाहीत केवळ इतर सहकारी कारखान्यांनाच भाड्यानं चालवायला दिले जातील असा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय.

 

15 ते 19 वर्षांच्या कालावधीसाठी हे कारखाने भाड्यावर दिले जातील. कारखान्यांचं कर्ज फिटल्यावर कारखाने पुन्हा मूळ भागीदार शेतकर्‍यांना परत केले जाणार अशी घोषणा सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली.

 

काही दिवसांपूर्वी तासगाव-पलूस सहकारी साखर कारखाना खासगी व्यावसायिकांना विकल्याच्या विरोधात शेतकर्‍यांनी आंदोलन केलं होतं. त्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला.

close