‘प्रणाली रहाणे मृत्युप्रकरणी ‘विशाखा गाईडलाईन्स’वापरा’

September 4, 2013 9:53 PM0 commentsViews: 457

pranali rahane04 सप्टेंबर : नाशिकमधील प्रणाली रहाणेच्या मृत्युप्रकरणी विशाखा गाईडलाईन्सखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलीय. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी रॅगिंग प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र, कामाच्या ठिकाणी झालेला छळ, हा गुन्हा विशाखा गाईडलाईन्सखाली असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

 

कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या या मार्गदर्शक सूचना आहेत. बॉश कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणार्‍या प्रणालीनं सहकार्‍यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. पण त्यानंतर बॉश कंपनीने या प्रकरणातून अंग काढून घेत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

 

त्याची योग्य अंमलबजावणी झाली असती तर प्रणालीचा जीव वाचला असता अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. पोलिसांच्या कारवाईनंतर कंपनी व्यवस्थापनानं या प्रकरणी पोलिसांच्या अहवालानंतर पुढील कारवाई करणार असल्याचं बॉश कंपनीच्या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आलंय.

close