भाजपच्या पुण्यातल्या नगरसेवकाला जन्मठेप

January 30, 2009 8:54 AM0 commentsViews: 1

30 जानेवारी, पुणेपुण्यातले भाजपचे नगरसेवक दत्ता खाडेला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. राजेश परदेशी खून प्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2004 मध्ये राजेश परदेशीचा खून करण्यात आला होता.पुण्याच्या भर वस्तीत दत्ता खाडेनं हा खून केला होता. गुडलक चौकातील वसंत हेअर कटिंग सलूनमध्ये 11 फेब्रुवारी 2004 रोजी दाढी करत होता. त्याच्यासोबत त्याचे मित्रही होते. त्यांपैकी एकाचं राजेश परदेशीबरोबर वैर होतं. त्यावेळेस तेथे राजेश परदेशी आला आणि त्यांची बाचाबाची झाली. त्याचं पर्यवसन भांडणात झालं. यावेळी झालेल्या मारामारीत परदेशीवर चाकूने वार करण्यात आले. त्यातच परदेशीचा मृत्यू झाला. या प्रकरणी खुनामध्ये दत्ता खाडेचा प्रत्यक्ष सहभाग आढळून आला आहे.काही दिवसांपूर्वीच कुख्यात गुन्हेगार बाबा बोडकेच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेशावरून वादळ उठले होते. आता तर भाजपाचा नगरसेवकच खून प्रकरणात दोषी आढळल्याने राजकारणातील गुन्हेगारीचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.

close