वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासित करावा : शिवसेना

January 30, 2009 6:14 PM0 commentsViews: 1

30 जानेवारी, दिल्लीवादग्रस्त सीमाभाग हा केंद्रशासित प्रदेश करावा, अशी मागणी शिवसेनेच्या वतीनं मनोहर जोशी यांनी केली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. बेळगावला केंद्रशासित प्रदेश घोषीत करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे."सामाभागातील मराठी भाषिकांची कर्नाटक सरकारनं गळचेपी चालवली आहे . त्याविरुद्ध सीमाभागात प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे जोपर्यंत हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहेत, तोपर्यंत बेळगावसमावेत सीमाभागातील वादग्रस्त प्रदेश केंद्रशासित करावेत जेणेकरून मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही. ही मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे, तसं निवेदनही दिलं आहे" असं मनोहर जोशी म्हणाले.

close