दाभोलकरांच्या खुनाचा तपास NIAकडे द्या -दलवाई

September 5, 2013 5:05 PM1 commentViews: 193

Image img_152432_husendalvai_240x180.jpg05 सप्टेंबर : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवा अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत केली आहे. डॉ दाभोलकर खून प्रकरणाचा तपास करण्यात पुणे पोलीस अपयशी ठरले आहेत.

 

खून प्रकरणाला 15 दिवस उलटून गेलेत आणि मारेकरी अजुनही मोकाट आहेत त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयएकडेच देणं योग्य ठरेल असंही दलवाई यांनी म्हटलं आहे.

 

नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर राज्यसभेत पडसाद उमटले होते. यावेळी हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत सनातनी संघटनेवर बंदी आणावी अशी मागणी केली होती.

  • Brave Bravest

    good one !!

close