28 फुटी गणपती

September 5, 2013 6:00 PM0 commentsViews: 390

05 सप्टेंबर : पुणे, मुंबईबरोबरच बेळगावमध्येही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतोय. कर्नाटक, गोवा व दक्षिण महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी बेळगावचा गणेशोत्सव एक आकर्षणाचा आहे. बेळगाव शहरात 365 सार्वजनिक गणपतींची प्रतिष्ठापना होते. यावर्षी इको फ्रेंडली गणपतींचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसून येतोय. यापैकीच एक बेळगावमधील सदाशिवनगर येथे पेपरशीटचा 28 फूट उंचीचा हनुमानरूपी गणराया आणि उत्तराखंड येथील दुर्घटनेवर आधारित देखावा तयार करण्यात येत आहे. बेळगावकरही निसर्ग संरक्षणाची जाणीव ठेवून गणेशोत्सावाची जय्यत तयारी करताहेत.

close