S M L

बदलाचे वारे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 28, 2014 03:30 PM IST

बदलाचे वारे

blog amruta durve ibn lokmat- अमृता दुर्वे,सीनिअर  एडिटर प्रॉड्यूसर,IBN लोकमत

LG G3 भारतात लाँच झाला आणि अपेक्षेप्रमाणेच त्याची चर्चा सुरू झाली... एकतर बिग बींनी त्याबाबत ट्विट केलं आणि ही चर्चा जोरदार पसरली... पण या फोनमध्ये असं काय आहे, ज्याची इतकी चर्चा होतेय...

तो आहे या फोनचा डिस्प्ले... कारण या डिस्प्लेमुळे मोबाईल जगात पुन्हा एकदा बदलाचे वारे वाहायला लागले आहेत... मोबाईल फोन्सच्या जगात फोन कॉल्सचे दर 1 रुपयावर आले तेव्हा किंवा पर सेकंड बिलिंग सुरू झालं तेव्हा...किंवा मग भन्नाट रेझोल्युशनचे कॅमेरे आले तेव्हा असे बदल झपाट्याने घडले होते. 8 मेगापिक्सेलचं कौतुक वाटत असतानाच 12 मेगापिक्सेल - 14 मेगापिक्सेलचे कॅमेरे असणारे फोन्स आले...आता तर तब्बल 42 मेगापिक्सेलचा फोन बाजारात आहे. तर सामान्य कोणताही फोन घेतला तर त्याला 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा असतोच...म्हणजे टेक्नॉलॉजी सामान्यांपर्यंत जास्त वेगाने आलेली आहे.

तीच गोष्ट आता मोबाईल्सच्या डिस्प्लेबाबत होणार आहे. 2K किंवा WQHD डिस्प्ले असणारा हा जगातला पहिला फोन आहे. म्हणजे तब्बल 2560 X 1440 पिक्सेल्स रिझोल्युशनचा आणि 550 PPI डेन्सिटीचा फोन तुमच्या हातात असेल. जगातले सगळे टेकप्रेमी या नंबर्सवर भन्नाट खूश आहेत...कारण सध्या आपल्या घरांमध्ये असणारे टीव्ही 1080p रिझोल्युशनचे आहेत... 4K रिझोल्युशनचे टीव्ही आवाक्याच्या प्रचंड बाहेर आहेत... म्हणजे हा फोन या बाबतीत टीव्हीच्याही अनेक पावलं पुढे गेलेला आहे...कारण तो काही लोकांच्या तरी हातात येणार आहे.

पण याने काय बदलेल? तर फोनचे, टीव्हीचे सध्या असलेले डिस्प्ले आणखीन सुधारत जातील. एखादी टेक्नॉलॉजी जसजशी प्रगत होते, जास्तीत जास्त वापरली जाते तशी स्वस्तही होते. सगळ्यांच्या आवाक्यात येते.

सध्यातरी या फोनवर व्हिडिओ किंवा फिल्म बघण्यातला एक्सपिरियन्स नेहमीपेक्षा किती वेगळा आहे ही बाब तज्ज्ञ तपासून बघतायत. फोनच्या वापरात तरी या डिस्प्लेमुळे फारसा बदल येणार नाही. बदल येईल तो व्हिडिओज, गेमिंग यासारख्या बाबींमध्ये.

पण यापुढे या फोनमुळे ज्या गोष्टी होतील, ते जास्त एक्सायटिंग आहे. ते म्हणजे आता टीव्हीमध्येही अधिक चांगलं रिझोल्युशन देण्याचा प्रयत्न होईल आणि यामुळे कमी बजेटचे फोन किंवा टीव्हीमध्येही आपल्याला चांगलं रिझोल्युशन मिळू शकेल.

सध्या या LG G3 ची किंमत आहे 47,990 रुपये. भारतीय मार्केटमध्ये सध्या याहीपेक्षा महाग असलेले फोन्स आहेत आणि विकलेही जातायत. शिवाय सॅमसंग गॅलक्सी S5 सारखा फोन 51 हजारांना लाँच होऊन आता फक्त काही महिन्यांच्या अवधीत 34-35 हजारांवर आलेला आहे. म्हणजे काही महिन्यांमध्ये याही फोनची किंमत कमी होण्याची अपेक्षा आपण करू शकतो. चर्चा तर खूप झालीय. आता हा फोन किती कसोटीवर खरा ठरतो हे पाहायचं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 27, 2014 07:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close