S M L

एका मुंबईकराचे नव्या सरकारला खणखणीत पत्र

Sachin Salve | Updated On: Nov 1, 2014 04:57 PM IST

एका मुंबईकराचे नव्या सरकारला खणखणीत पत्र

mumbaikar_letter नवं सरकार आणि नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सर्वांनाच खूप अपेक्षा आहे. पण एका मुंबईकराने नव्या सरकारला आणि नव्या मुख्यमंत्र्यांना आपल्या समस्यामय पत्र लिहलंय. सध्या व्हॉट्सअपवरही 'मी मुंबईकर' म्हणून हे पत्र फिरतंय. या पत्रात या अस्सल मुंबईकरांने नव्या सरकारकडून काही मागण्या,आशा, अपेक्षा केल्या आहेत. या मुंबईकरांचं पत्र जसेच्या तसे...

मुंबईकराचं भाजपला पत्र

प्रिय भाजप,

मी मुंबईकर आहे आणि हे पत्र विशेष करून सर्व भाजप नेत्यांसाठी आहे. या पत्राकडे आव्हान म्हणून बघावं, ही विनंती...नाहीतर आमच्यावर मूर्खच राज्य करताना आम्ही पाहत आलोय आणि त्यातले तुम्ही नाही हे तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर आमच्या काही प्राथमिक गरजा फक्त पूर्ण करा.

त्या खालीलप्रमाणे आहेत:

1. खराब रस्ते

आपले शास्त्रज्ञ मंगळावर पोहोचले. पण, आम्हाला खाचखळग्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर दाराबाहेर पडलं तरी पुरे.

2. राजकीय नेत्यांचे होर्डिंग

तुमच्या नेत्यांचे वाढदिवस आणि शुभेच्छा पुरे झाल्या. आम्हाला त्याच्याशी काहीही घेणंदेणं नाही. आम्हाला त्यांच्या शुभेच्छा नकोत.

आम्हाला आमचं शहर स्वच्छ हवंय.

3. शहरातल्या महिलांसाठी चांगली स्वच्छतागृहं हवीत. शहरातलं एकही सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याजोगं नाही ही शरमेची बाब आहे.

4.वाहतुकीच्या चांगल्या सोयी

उपनगरातून शहरात जाण्यासाठी ताशी 20 किमी वेगाने गाडी चालवणारे आमच्यासारखे मूर्ख आम्हीच.

5.आमच्या आई, बहिणी आणि मुलींसाठी चोवीस तास सुरक्षा हवी. हे जगातलं सर्वात सुरक्षित शहर आहे, असं आम्हाला अभिमानानं सांगता आलं पाहिजे.

6. मुंबईचा फक्त एकच धर्म आहे... मुंबईकर

आम्ही इथे राहतो. खूप, खूप मेहनत घेतो आणि हे शहर 24 तास जिवंत ठेवतो. त्यामुळे कृपया फोडा आणि राज्य करा, या जुन्या पद्धतीचा वापर करू नका. आम्हाला फक्त काम आणि कामाचीच पर्वा आहे.

तुमचा

(प्रचंड वैफल्यग्रस्त)

मुंबईकर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2014 08:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close